देवचि झाले अंगे – संत निळोबाराय अभंग – ११८५

देवचि झाले अंगे – संत निळोबाराय अभंग – ११८५

देवचि झाले अंगे ।
देवा भजतां अनुरागें ॥१॥
शुक प्रल्हाद नारद ।
अंबरिष रुकमांगद ॥२॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान ।
नामा सजना आणि जाल्हाण्‍ ॥३॥
कूर्मा विसोबा खेचर ।
सावता चांगा वटेश्वर ॥४॥
कबीर सेना सूरदास ।
नरसीमेहता भानुदास ॥५॥
निळा म्हणे जनार्दन एका ।
देवचि होउनी ठेला तुका ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देवचि झाले अंगे – संत निळोबाराय अभंग – ११८५