देव चालिला सांगातें – संत निळोबाराय अभंग – ११८३
देव चालिला सांगातें ।
भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥
परम आनंद उभयतांसी ।
देवभक्तां सुखाच्या रासी ॥२॥
चालतां मारगीं ।
कथा कीर्तन प्रसंगीं ॥३॥
निळा म्हणे देवभक्तां ।
परमविश्रांती चालतां ॥४॥
देव चालिला सांगातें ।
भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥
परम आनंद उभयतांसी ।
देवभक्तां सुखाच्या रासी ॥२॥
चालतां मारगीं ।
कथा कीर्तन प्रसंगीं ॥३॥
निळा म्हणे देवभक्तां ।
परमविश्रांती चालतां ॥४॥