देव घरा आला – संत निळोबाराय अभंग – ११८२

देव घरा आला – संत निळोबाराय अभंग – ११८२


देव घरा आला ।
भक्तिं सन्मानें पूजिला ॥१॥
पाहुणेर पंगती ।
संत व्दिजवृंदें शोभती ॥२॥
पुढें आरंभूनी कथा ।
बुका माळा गंधाक्षता ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हानंदें ।
नाचती उभयतां आनंदें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देव घरा आला – संत निळोबाराय अभंग – ११८२