ठायींचा हा ऋणानुबंध – संत निळोबाराय अभंग – ११८१
ठायींचा हा ऋणानुबंध ।
प्रीतिवाद उभयतां ॥१॥
म्हणोनि एक एकाधीन ।
जाणती उणखूण येरयेरां ॥२॥
देव जाणे अंतरींचे ।
केलें भक्ताचें प्रतिपादी ॥३॥
निळा म्हणे भिन्न भाव ।
नाहीं देवभक्तांचा ॥४॥
ठायींचा हा ऋणानुबंध ।
प्रीतिवाद उभयतां ॥१॥
म्हणोनि एक एकाधीन ।
जाणती उणखूण येरयेरां ॥२॥
देव जाणे अंतरींचे ।
केलें भक्ताचें प्रतिपादी ॥३॥
निळा म्हणे भिन्न भाव ।
नाहीं देवभक्तांचा ॥४॥