देव हांसोनि बोलती – संत निळोबाराय अभंग – ११८०
देव हांसोनि बोलती ।
नको येऊं काकुलती ॥१॥
आम्ही रंजवु आपणीयां ।
तुझिये वाचे चेतवूनियां ॥२॥
नलगें कांहीं परिहार ।
देणें तुज धरीं धीर ॥३॥
निळा म्हणे चरणांवरी माथा ।
ठेवूनी करी पुढें कथा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
देव हांसोनि बोलती – संत निळोबाराय अभंग – ११८०