कांही कार्य मांडेल जेव्हां – संत निळोबाराय अभंग – ११७८
कांही कार्य मांडेल जेव्हां ।
मजचि प्रगट होणें तेव्हां ॥१॥
जवळिच आहे भेऊं नका ।
माझिया बळें दुर्जन लोकां ॥२॥
तुम्हां गांजिती व्देषिती ।
त्यांची समूळ विनशति ॥३॥
निळा म्हणे भगवदवाणी ।
ऐसी प्रविष्ट झाली श्रवणीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कांही कार्य मांडेल जेव्हां – संत निळोबाराय अभंग – ११७८