देव आदरें म्हणे भक्तां – संत निळोबाराय अभंग – ११७६
देव आदरें म्हणे भक्तां ।
घ्या हो भुक्ति मुक्ति आतां ॥१॥
भक्त म्हणती नेघों देवा ।
पुरे आम्हां तुझीचि सेवा ॥२॥
रिध्दिध्दी तरी घ्या रे ।
भक्त त्यागिती धिक्कारें ॥३॥
निळा म्हणे करुनी साठीं ।
बैसलें चरणीं घालुनी मिठी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
देव आदरें म्हणे भक्तां – संत निळोबाराय अभंग – ११७६