मग हळूचि बोले अमृतवाणी – संत निळोबाराय अभंग – ११७४
मग हळूचि बोले अमृतवाणी ।
मागा म्हणोनी निजभक्तां ॥१॥
मुक्त होईन सेवाऋणा ।
घ्या हो वरदाना इच्छेच्या ॥२॥
तुम्हांसी जें जें वाटे गोड ।
मागा कोड पुरतें ॥३॥
निळा म्हणे भक्त त्या म्हणती ।
आम्हांसी प्रीति तुमचीच ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मग हळूचि बोले अमृतवाणी – संत निळोबाराय अभंग – ११७४