निभर्य असा माझया बळें – संत निळोबाराय अभंग – ११७३

निभर्य असा माझया बळें – संत निळोबाराय अभंग – ११७३


निभर्य असा माझया बळें ।
कळिकाळें ती रंकें ॥१॥
सुखें करा हरिची कथा ।
तुमची चिंता मज आहे ॥२॥
पाचाराल तेचि घडीं ।
येईन तांतडीं धांवत ॥३॥
निळा म्हणे अमृतवंचनें ।
दे वरदानें दासांसी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकोनियां संतवाणी – संत निळोबाराय अभंग – ११७३