एकोनियां संतवाणी – संत निळोबाराय अभंग – ११७२
एकोनियां संतवाणी ।
चक्रपाणी संतोषे ॥१॥
म्हणे यारे भिऊं नका ।
माझिया सेवका भय नाहीं ॥२॥
नाम मुखीं न संडावें ।
भजा भावें संतोशीं ॥३॥
निळा म्हणे ऐसी हरी ।
आज्ञा करी निजदासा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
एकोनियां संतवाणी – संत निळोबाराय अभंग – ११७२