हो तुम्ही कृपावंता ।
किती आतां विनवावें ॥१॥
न दयाचि कांही प्रत्युतर ।
ऐसे निष्ठुर केवि तरी ॥२॥
नेणों दासाचा त्रास आला ।
दिसे मांडिला अव्हेर ॥३॥
काय करुणाचि हारविली ।
विपरीत झाली दशा दिसे ॥४॥
निळा म्हणे म्हातारपण ।
आलें दारुण नुठवेसें ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
भक्तिं भावचि बांधिला गांठी – संत निळोबाराय अभंग – ११७१