हो तुम्ही कृपावंता- संत निळोबाराय अभंग – ११७१
हो तुम्ही कृपावंता ।
किती आतां विनवावें ॥१॥
न दयाचि कांही प्रत्युतर ।
ऐसे निष्ठुर केवि तरी ॥२॥
नेणों दासाचा त्रास आला ।
दिसे मांडिला अव्हेर ॥३॥
काय करुणाचि हारविली ।
विपरीत झाली दशा दिसे ॥४॥
निळा म्हणे म्हातारपण ।
आलें दारुण नुठवेसें ॥५॥