पुसे क्षेम भक्तांलागीं – संत निळोबाराय अभंग – ११६५
पुसे क्षेम भक्तांलागीं ।
म्हणतसे मार्गी श्रमलेती ॥१॥
प्रतिवरुषीं भेटी देतां ।
सांभाळितां येउनी ॥२॥
नाहीं तुमचे उत्तीर्ण झालों ।
कधीं आलों गांवासी ॥३॥
निळा म्हणे आभारला ।
प्रसन्न झाला दासासी ॥४॥