देव म्हणे भक्तराजा – संत निळोबाराय अभंग – ११६२
देव म्हणे भक्तराजा ।
अव्हेर माझा न करावा ॥१॥
भोजनकाळीं पाचारावें ।
मजही घ्यावें सांगातें ॥२॥
भोजनीं तुमच्या तृप्ती मज ।
काजें काज तुमचिया ॥३॥
निळा म्हणे अंतर नका ।
असो एकएका माझारीं ॥४॥
देव म्हणे भक्तराजा ।
अव्हेर माझा न करावा ॥१॥
भोजनकाळीं पाचारावें ।
मजही घ्यावें सांगातें ॥२॥
भोजनीं तुमच्या तृप्ती मज ।
काजें काज तुमचिया ॥३॥
निळा म्हणे अंतर नका ।
असो एकएका माझारीं ॥४॥