संत निळोबाराय अभंग

ऐकोनि संत हांसतील – संत निळोबाराय अभंग – ११६०

ऐकोनि संत हांसतील – संत निळोबाराय अभंग – ११६०

ऐकोनि संत हांसतील ।
तुम्हांसी येईल मग लाज ॥१॥
कौल दिला राहे सुखें ।
न म्हणो मुखें दे ऐसें ॥२॥
मागावें तें आम्हांचि जवळी ।
आहे नामावळीं पढों सुखें ॥३॥
आणिखी तुमची नाहीं आशा ।
ठेवा कैशा मुक्तिहि त्या ॥४॥
निळा म्हणे आपुल्याचि सुखें ।
असों हरिखें अखंडित ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐकोनि संत हांसतील – संत निळोबाराय अभंग – ११६०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *