संत निळोबाराय अभंग

नामें आळवितां आठी – संत निळोबाराय अभंग – ११५९

नामें आळवितां आठी – संत निळोबाराय अभंग – ११५९


नामें आळवितां आठी ।
तुम्हां पोटीं भय वाटें ॥१॥
नेणों कांहीं मागतील ।
किंवा येतील वैकुंठा ॥२॥
काय वाटूं किती देऊं ।
म्हणोनियां जिऊ निर्बुजला ॥३॥
ऐसें जाणोनी लपालेती ।
घेतलें चित्तीं भय वाटे ॥४॥
याचि लागीं उत्तर न दया ।
कळलें गोविंदा मनोगत ॥५॥
निळा म्हणे सुखी असा ।
न मागों सहसा आण तुमची ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामें आळवितां आठी – संत निळोबाराय अभंग – ११५९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *