निरंतर नाम वदनीं – संत निळोबाराय अभंग – ११५७
निरंतर नाम वदनीं ।
निजरुप ध्यानीं आठवितों ॥१॥
आणीक देवा कांही नेणें ।
मिरवूं भूषणें भक्तीचीं ॥२॥
योगसाधन न कळें मंत्र ।
निगमशास्त्र व्युत्पत्ती ॥३॥
निळा म्हणे अज्ञान हरि ।
आहे परी सर्व मी ॥४॥
निरंतर नाम वदनीं ।
निजरुप ध्यानीं आठवितों ॥१॥
आणीक देवा कांही नेणें ।
मिरवूं भूषणें भक्तीचीं ॥२॥
योगसाधन न कळें मंत्र ।
निगमशास्त्र व्युत्पत्ती ॥३॥
निळा म्हणे अज्ञान हरि ।
आहे परी सर्व मी ॥४॥