हरुनियां घ्यावें चित्त – संत निळोबाराय अभंग – ११५३
हरुनियां घ्यावें चित्त ।
आवघेंचि वित्त धन माझें ॥१॥
हें तों नव्हे उचित तुम्हां ।
पुरुषेत्तमा विचारा ॥२॥
दर्शनाचें हेंचि फळ ।
सोडावें निढळ करुनियां ॥३॥
निळा म्हणे हाईल टीका ।
माजीं या लोका तुमचीच ॥४॥