सांडियलें बाळा – संत निळोबाराय अभंग – ११५२
सांडियलें बाळा ।
कैसी निष्ठुर वेल्हाळा ॥१॥
ऐसीं बोलतील सकळें ।
नारी नर हांसती बाळें ॥२॥
माय नव्हे म्हणती लांव ।
ऐसें उपहासिती सर्व ॥३॥
निळा म्हणें सर्व जनीं ।
ऐसी होईल टेहणी ॥४॥
सांडियलें बाळा ।
कैसी निष्ठुर वेल्हाळा ॥१॥
ऐसीं बोलतील सकळें ।
नारी नर हांसती बाळें ॥२॥
माय नव्हे म्हणती लांव ।
ऐसें उपहासिती सर्व ॥३॥
निळा म्हणें सर्व जनीं ।
ऐसी होईल टेहणी ॥४॥