संतवचनें खरीं होतीं – संत निळोबाराय अभंग – ११५१
संतवचनें खरीं होतीं ।
वाढेल जगीं तुमची कीर्ति ॥१॥
जरी माझे समाधान ।
कराल देउनी आलिंगन ॥२॥
नाहीं तुम्हां जाणें येणें ।
कांहीं कोठूनियां धांवणें ॥३॥
निळा म्हणे विश्वंभरा ।
प्रकटा ह्रदयीं वास करा ॥४॥