लोभियानें धन केलें – संत निळोबाराय अभंग – ११४७
लोभियानें धन केलें भूमिगत ।
दगडही थित घालूनी वरी ॥१॥
तैसे तुम्हीं देवा केलें आपणांसी ।
कळंक यशासी लावियला ॥२॥
बुडविलें राज्य रायें सुरापानें ।
नसतां सावधान राज्यकार्या ॥३॥
निळा म्हणे आळसें बुडविला संसार ।
न गमतां व्यवहार साउकारें ॥४॥