लाज वाटे जीव करी – संत निळोबाराय अभंग – ११४५

लाज वाटे जीव करी – संत निळोबाराय अभंग – ११४५

लाज वाटे जीव करी तळमळ ।
चिंते वक्षस्थळ व्यापियेलें ॥१॥
पडिलों निढळ न सुचेचि विचार ।
तुम्हीं तों निष्ठुर धरियेलें ॥२॥
कैसेनि भेटी होईल पायांसी ।
उघडल्या त्या राशी पापाचिया ॥३॥
काय नेणों पूर्वी केलें आचरण ।
तें आलें मोडोन फळभारें ॥४॥
नामाच्या चिंतनें नव्हे त्याची शांती ।
ऐशी काळगती विपरित ॥५॥
निळा म्हणे नेणें आपुलिया मती ।
परी तुम्ही श्रीपति सर्व जाणा ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

लाज वाटे जीव करी – संत निळोबाराय अभंग – ११४५