राग आला तरी – संत निळोबाराय अभंग – ११४२
राग आला तरी ।
माय बाळातें नाव्हेरी ॥१॥
राखे त्याची भूक तान ।
न मारी कापूनियां मान ॥२॥
शांतवुनी स्तनी ।
लावी तया न्याहाळुनी ॥३॥
निळा म्हणे धरी ।
अंकी तया माया करी ॥४॥
राग आला तरी ।
माय बाळातें नाव्हेरी ॥१॥
राखे त्याची भूक तान ।
न मारी कापूनियां मान ॥२॥
शांतवुनी स्तनी ।
लावी तया न्याहाळुनी ॥३॥
निळा म्हणे धरी ।
अंकी तया माया करी ॥४॥