येईल चित्तासी तें तुम्हां – संत निळोबाराय अभंग – ११४०
येईल चित्तासी तें तुम्हां उचित ।
आपुलें संचित भोगूं आम्ही ॥१॥
काय समर्थासी विनवावें रंकें ।
कोण त्याचें ऐके वचन तेथें ॥२॥
थोरा घरीं थोरा होतो बहुमान ।
कोण पुसे दीन याचकासी ॥३॥
निळा म्हणे आम्हीं मानिला विश्वास ।
तो दिसे निरास अवघी येथें ॥४॥