पळवाया न दिसे – संत निळोबाराय अभंग – ११४

पळवाया न दिसे – संत निळोबाराय अभंग – ११४


पळवाया न दिसे मार्ग
पक्षी जळताती भुजंग
श्रवापदांचे कोंडले तुंग
मृग व्याघ्रें कालवती ॥१॥
वृकवराह पंचानन
ससे जंबुक सामर भेवन
रानम्हैसे रोही हरिण
जीव धाकें मिसळति ॥२॥
ज्वाळा लागती आकाशीं
धूम्रें कोंडिले रवि शशी
वृक्ष जळताती तेणें त्यांसी
तडक फुटती सर्वांगी ॥३॥
प्रचंड वाताचिया लोरी
तुटती तेणें गगनोदरी
शिखा आंदोळती अंबरी
तेणें फडत्कार वाजति ॥४॥
देखोनिया भ्याले सकळ
गवगविले अवघे गोंवळ
म्हणति आला अंतकाळ
गाईगोधनांसमवेत ॥५॥
ठिणगिया उडती असंख्यात
इंगळ येऊनी पडती आंत
आतां कैचा गोकुळप्रांत
मार्गचि नाही पळावया ॥६॥
निळा म्हणे घालिती कंठी
येर येरांचिया धांवोनि मिठी
हें देखोनियां तो जगजेठी
म्हणे रे कोणी भेऊं नका ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पळवाया न दिसे – संत निळोबाराय अभंग – ११४