मोकलितां धाय – संत निळोबाराय अभंग – ११३८
मोकलितां धाय ।
नाईकसी कैसी माय ॥१॥
सांडियले दूर देशीं ।
नये करुणा कांहीं ऐशी ॥२॥
वेष्टीलें श्वापदीं ।
अहंकार मोहमदीं ॥३॥
निळा म्हणे यावरी आई ॥
धांव घालीं वो विठाई ॥४॥
मोकलितां धाय ।
नाईकसी कैसी माय ॥१॥
सांडियले दूर देशीं ।
नये करुणा कांहीं ऐशी ॥२॥
वेष्टीलें श्वापदीं ।
अहंकार मोहमदीं ॥३॥
निळा म्हणे यावरी आई ॥
धांव घालीं वो विठाई ॥४॥