भक्तिपंथें न चले कोणी ।
वाट जाईल मोडोनी ॥१॥
जरि अनाथा धांवणें ।
न कराल तुम्ही थोरपणें ॥२॥
आमचा जन्म वायां गेला ।
शब्द तुम्हांसी लागला ॥३॥
निळा म्हणे नव्हे भली ।
पुढें वाट खोळंबली ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.