भक्तिपंथें न चले कोणी – संत निळोबाराय अभंग – ११३५
भक्तिपंथें न चले कोणी ।
वाट जाईल मोडोनी ॥१॥
जरि अनाथा धांवणें ।
न कराल तुम्ही थोरपणें ॥२॥
आमचा जन्म वायां गेला ।
शब्द तुम्हांसी लागला ॥३॥
निळा म्हणे नव्हे भली ।
पुढें वाट खोळंबली ॥४॥
भक्तिपंथें न चले कोणी ।
वाट जाईल मोडोनी ॥१॥
जरि अनाथा धांवणें ।
न कराल तुम्ही थोरपणें ॥२॥
आमचा जन्म वायां गेला ।
शब्द तुम्हांसी लागला ॥३॥
निळा म्हणे नव्हे भली ।
पुढें वाट खोळंबली ॥४॥