बोलिलों तें तुम्हां उणें – संत निळोबाराय अभंग – ११३३
बोलिलों तें तुम्हां उणें ।
कीजे क्षमा नारायणें ॥१॥
आपुलिये मी तळमळें ।
दु:खें चावळलों तें कळे ॥२॥
समर्थाची गतिमति ।
कोण जाणें कैसी रीति ॥३॥
निळा म्हणे उचित करा ।
जैसें आपुलें तें दातारा ॥४॥