बरें होणार ते झाली – संत निळोबाराय अभंग – ११३२

बरें होणार ते झाली – संत निळोबाराय अभंग – ११३२

बरें होणार ते झाली माझी गती ।
हळहळ किती वाढवावी ॥१॥
परी तुमच्या ब्रीदा लागला कळंक ।
दुराविल्या एक मशक मी ॥२॥
होती वाढविली कीर्ति तिहीं लोकीं ।
ते आजी निष्टंकीं वाहविली ॥३॥
म्हणती शरणांगत येणें उपेक्षिला ।
लौकिक हा झाला भला काय ॥४॥
समर्था चुकल्या भला कोणीही हांसे ।
अनाथासी नसे शंका कांहीं ॥५॥
निळा म्हणे जागा आपुल्या उचिता ।
आम्ही तो संचिताधीन झालों ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बरें होणार ते झाली – संत निळोबाराय अभंग – ११३२