गोवळ देती उष्टावळी – संत निळोबाराय अभंग – ११३

गोवळ देती उष्टावळी – संत निळोबाराय अभंग – ११३


गोवळ देती उष्टावळी
म्हणती गोड हें वनमाळी
घालूनियां श्रीमुख त्या कमळीं
परम संतोषें स्वीकारी ॥१॥
आवडीचें तेचि तें गोड
भाव देखे ज्याचा वाड
त्याचेचि घे येरा निचाड
दांभिका अभिमानायाचें वोसंडी ॥२॥
ऐसा करिती गदारोळ
घालिती येरयेरा मुखीं कवळ
ब्रम्हानंदाचा सुकाळ
हास्यविनोदें जेविती ॥३॥
नाना लावणशाखांच्या परी
नाना पत्रशाखा वाढिल्या वरी
नाना अन्नाअन्नाच्या कुसरी
जेविती मुरारीसमवेंत ॥४॥
म्हणती आजच्या जेवणा
आम्हां श्रीहरी हा पाहुणा
न म्हणे उच्छिष्ट शिळें कोणा
अवघियांचे स्वीकारितु ॥५॥
ऐसें जूउनियां घाले
तंव गाईचे कळप देखिले
पाहती तंव नवल वर्तलें
बुजल्‍या पळती जीवधाकें ॥६॥
निळा म्हणे उठिला पाळा
अवलोकिती जो अवघे डोळां
तंव त्या देखिल्या ज्वाळा
वणवा जळत चौफेरीं ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोवळ देती उष्टावळी – संत निळोबाराय अभंग – ११३