तुम्ही देवा कृपावंत – संत निळोबाराय अभंग – ११२७

तुम्ही देवा कृपावंत – संत निळोबाराय अभंग – ११२७


तुम्ही देवा कृपावंत ।
आम्ही अनाथ दुर्बळें ॥१॥
म्हणोनियां थोरपण तुम्हां ।
येतें पुरुषत्तमा आमुचेनि ॥२॥
समानपणें असतों तरी ।
तुमची थोरी न दिसती ॥३॥
निळा म्हणे लोखंडें जैसा ।
दिधला परिसा बडिवार ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुम्ही देवा कृपावंत – संत निळोबाराय अभंग – ११२७