तुम्ही तों कृपेचे सागर – संत निळोबाराय अभंग – ११२६
तुम्ही तों कृपेचे सागर ।
परि दुस्तर कर्म माझें ॥१॥
म्हणेनियां नये करुणा ।
माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥
नेणें जप तप ध्यान कांहीं ।
पडिलों प्रवाहीं प्रपंचा ॥३॥
निळा म्हणे केली सेवा ।
माझी हे देवा न पावेचि ॥४॥