गोमटा म्हणती मानवदेहो – संत निळोबाराय अभंग – ११२३

गोमटा म्हणती मानवदेहो – संत निळोबाराय अभंग – ११२३

गोमटा म्हणती मानवदेहो ।
केला उपाव फळ देतो ॥१॥
तरी कां माझा विफळ गेला ।
धांवा केला तुमचा तो ॥२॥
कांहीच न करा आश्वासन ।
उध्दिग्न मन यासाठीं ॥३॥
निळा म्हणे यावरी काय ।
किजे उपाय तो नेणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोमटा म्हणती मानवदेहो – संत निळोबाराय अभंग – ११२३