गेलें वेंचोनियां वय – संत निळोबाराय अभंग – ११२२

गेलें वेंचोनियां वय – संत निळोबाराय अभंग – ११२२

गेलें वेंचोनियां वय याचिपरी ।
चिंता महापुरीं वाहवलों ॥१॥
धरियेला होता तो विश्वास मानसीं ।
येणें काळें त्यासीं क्षय आला ॥२॥
आतां कोठवरीं धरावा तो धीर ।
न दिसे पायीं थार तुमचिये ॥३॥
मागें कित्येकांसी तुम्ही उठाउठी ।
येऊनि धरिलें पोटीं निवविलें ॥४॥
माझे वेळे कांहो पडिला ऐसा फेर ।
कर्म बलोत्तर ओढवलें ॥५॥
निळा म्हणे करुं किती तरी शोक ।
वचनाचाहि एक आश्रय नये ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गेलें वेंचोनियां वय – संत निळोबाराय अभंग – ११२२