करा माझा अंगिकार – संत निळोबाराय अभंग – १११८
करा माझा अंगिकार ।
पतीतपावन थोर ब्रीदा ॥१॥
उपेक्षितां हांसती लोक ।
म्हणती सेवक जड झाले ॥२॥
मग ते तुम्हां होईल लाज ।
अंतरेल काज पुढील ही ॥३॥
निळा म्हणे अपकीर्ती अंगा ।
न ये पांडुरंगा करावें तें ॥४॥
करा माझा अंगिकार ।
पतीतपावन थोर ब्रीदा ॥१॥
उपेक्षितां हांसती लोक ।
म्हणती सेवक जड झाले ॥२॥
मग ते तुम्हां होईल लाज ।
अंतरेल काज पुढील ही ॥३॥
निळा म्हणे अपकीर्ती अंगा ।
न ये पांडुरंगा करावें तें ॥४॥