संत निळोबाराय अभंग

भूतीं उपद्रव दिधला – संत निळोबाराय अभंग – १११३

भूतीं उपद्रव दिधला – संत निळोबाराय अभंग – १११३


भूतीं उपद्रव दिधला ।
ताडिला अथवा निस्तेजिला ।
तेणें चित्ती दाहो जाला ।
अधिभौतिक बोलिला तो ताप ॥१॥
देहीं प्रगटे रोगव्याधी ।
तेणें आहाळली तापे बुध्दी ।
लोळे न पुरे दु:खावधी ।
आध्यात्मिक त्रिशुध्दि तो ताप ॥२॥
दैवें अतिवृष्टि का अनावृष्टि ।
रजीकें लुटिलें जाला कष्टी ।
आगीनें जळतां नावरें संकटीं ।
तो अधिदैव ताप बोलिजे ॥३॥
ऐसे त्रिविधताप सत्संगती ।
विवकेश्रवणें विलया जाती ।
म्हणोनि कीर्तनी बुध्दिमंतीं ।
आवश्य श्रवणार्थी बैसावें ॥४॥
निळा म्हणे होईल लाभ ।
ब्रम्हानंदा निघती कोंभ ।
प्रसन्न होउनी पद्मनाभ ।
शीतळ करील सर्वार्थीं ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भूतीं उपद्रव दिधला – संत निळोबाराय अभंग – १११३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *