संतोषतरुचें हें फळ – संत निळोबाराय अभंग – ११११
संतोषतरुचें हें फळ ।
आलें रसाळ पक्कदशे ॥१॥
सेविती ते तृप्त होती ।
ब्रम्हता पावती सनातन ॥२॥
रुची ऐसें आवडे तया ।
विरक्ता संसारिया सुखदाते ॥३॥
निळा म्हणे श्रवणपुटीं ।
लावितांचि पुष्टीकारक ॥४॥
संतोषतरुचें हें फळ ।
आलें रसाळ पक्कदशे ॥१॥
सेविती ते तृप्त होती ।
ब्रम्हता पावती सनातन ॥२॥
रुची ऐसें आवडे तया ।
विरक्ता संसारिया सुखदाते ॥३॥
निळा म्हणे श्रवणपुटीं ।
लावितांचि पुष्टीकारक ॥४॥