हरीचें मनोहर कीर्तन – संत निळोबाराय अभंग – १११०
हरीचें मनोहर कीर्तन ।
हेंचि साधन कलियुगीं ॥१॥
नको आणिकां मतांतरी ।
पडो भवसागरीं वहावसी ॥२॥
निश्चयाचें उत्तर हेंचि ।
करावी हरीची हरीभक्ती ॥३॥
निळा म्हणे ऐसें कानीं ।
सांगितले येऊनि गुरुदेवें ॥४॥
हरीचें मनोहर कीर्तन ।
हेंचि साधन कलियुगीं ॥१॥
नको आणिकां मतांतरी ।
पडो भवसागरीं वहावसी ॥२॥
निश्चयाचें उत्तर हेंचि ।
करावी हरीची हरीभक्ती ॥३॥
निळा म्हणे ऐसें कानीं ।
सांगितले येऊनि गुरुदेवें ॥४॥