देशें काळें वर्तमानें – संत निळोबाराय अभंग – १११

देशें काळें वर्तमानें – संत निळोबाराय अभंग – १११


देशें काळें वर्तमानें
न धरीं संकोच कांही मनें
मी तो ऐसाचि हें शहाणे
जाणती सकळ सर्वद्रष्टे ॥१॥
तंव तो आला अकस्मात
नारदमुनी गात नाचत
वंदूनियां श्रीकृष्णनाथ
कीर्ति विर्णित कृष्णाची ॥२॥
म्हणे उध्दरिलें विमलार्जुन
शापदग्ध हे कुबेरनंदन
भविष्य जाणोनियां दर्शन
घ्यावया तुझें पातलों ॥३॥
परात्पर तूं परत्पर तूं परमानंद
योगी हत्कमळींचा मकरंद
सगुणरुपियां सच्चिदानंद
यशोदेअंकी क्रीडसी ॥४॥
स्तवितां तूतें भागल्या श्रुती
मग त्या ठेलिया निवांती
त्या गापिकारुपें गोकुळा येती
तुजसी अंगसंग करावया ॥५॥
मग नमुनी यशोदेप्रती
म्हणे तूं वों भाग्यवंती
परमात्मा हा विश्रवतोमूर्ती
तुझिये अंकीं विराजला ॥६॥
निळा म्हणे वदोनी ऐसें
नारद गेला निज उददेशें
यशोदा ऐकोनियां निज मानसें
परम संतोष पावली ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देशें काळें वर्तमानें – संत निळोबाराय अभंग – १११