सांडूनि गुणदोषांची मात – संत निळोबाराय अभंग – ११०६

सांडूनि गुणदोषांची मात – संत निळोबाराय अभंग – ११०६

सांडूनि गुणदोषांची मात ।
करावा संघात संतांचा ॥१॥
साधकां हे सुगम वाट ।
वस्ती वैकुंठ पावावया ॥२॥
नित्य करितां हरीचीं कथा ।
दोषा दुरिता संहार ॥३॥
निळा म्हणे धरिल्या चित्तीं ।
भाविकां लाभती स्वानुभाव ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांडूनि गुणदोषांची मात – संत निळोबाराय अभंग – ११०६