सांगो जातां न कळे – संत निळोबाराय अभंग – ११०५
सांगो जातां न कळे वाचा ।
महिमा कथेचा अपार ॥१॥
श्रवणें पठणें हरिची कीर्ती ।
नाना याति उध्दारल्या ॥२॥
चतुष्पदें श्वानसूकरें ।
श्रवणवदारें मुक्ति त्यां ॥३॥
निळा म्हणे कीटक पक्षां ।
कीर्तनें वृक्षा हरिप्राप्ती ॥४॥