म्हणे बा गौळणीचिया – संत निळोबाराय अभंग – ११०

म्हणे बा गौळणीचिया – संत निळोबाराय अभंग – ११०


म्हणे बा गौळणीचिया रागें
तुज म्यां बांधलें रे प्रसंगें
तंव त्वां उपटूनियां श्रीरंगें
उखळ येथें अडकविलें ॥१॥
परी तें नयेचि तुज उगवितां
म्हणोनियां बळें ओढिलें ताता
तंव हे वृक्ष पडिले रे भाग्यवंता
अदृष्टें आमुच्या वांचलासी ॥२॥
मग त्या म्हणती गौळणी नारी
खेद न करीं वों सुंदरी
त्वांचि हा परमात्मा श्रीहरि
मारिला होता निज हस्तें ॥३॥
गत गोष्टी काय ते आतां
न करीं यावरी जिवा परता
उदंड गाहाणींही सांगतां
तूं तें तत्वतां मानू नको ॥४॥
आजींचाचि पाहें पां अनर्थ
केवढा चुकला अवचिता घात
अदृष्टाचा हा कृष्णनाथ
म्हणोनियां वांचला निज भाग्यें ॥५॥
आतां तरी सांभाळुनी
पहा हा भ्याला असेल मनीं
हे केवढे वृक्ष पडिले अवनीं
घोर घोषें दणाणिले ॥६॥
निळा म्हणे यावरी यशोदा ॥ पुसे भ्यालासि बारे गोविंदा
तव तो हांसोनियां गदगदा
म्हणे मज भ्य कोणाचें ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हणे बा गौळणीचिया – संत निळोबाराय अभंग – ११०