तेणें दणणिंले गोकुळ – संत निळोबाराय अभंग – १०९

 

तेणें दणणिंले गोकुळ – संत निळोबाराय अभंग – १०९


तेणें दणणिंले गोकुळ उतरंडीहि खचल्या सकळ ॥
धांविन्नले गौळी आणि गोवळ
म्हणती हा रवकल्लोळ कशाचा ॥१॥
तंव ते देखती अवघे नयनीं
वृक्ष पडिले ते उन्मळोनी
आश्रचर्य करिती आपुलाले मनीं
म्हणती हे कैसेनी उलंडले ॥२॥
यशोदा सांगे तयांप्रती
बांधला होतां म्या श्रीपती
तेणें येऊनियां आचिती
उखळ वृक्षाबुडीं अडकविलें ॥३॥
गौळणी सांगतां गाहाणें
मीहि संतापलें मनें
तेणें गळां बाधोनियां तान्हें
उखळेंसी म्यां ॥४॥
गेलें आणिकियां कामासीं
कृष्णें उपडूनियां उखळासी
वृक्ष मोडियेलें आवेशीं
माजीं आपणही पडियेला ॥५॥
थोर चुकलें हें अरिष्ट
तळीं सांपडतां होतां पिठ
ऐसें बोलोनियां अदृष्ट
ताडी आपुलिया निज करें ॥६॥
निळा म्हणे घेउनी त्यासी
सफुंदे यशोदा उकसाबुकसी
म्हणें माझिया हषिकेशी
कोणीहि देखों न शकती ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तेणें दणणिंले गोकुळ – संत निळोबाराय अभंग – १०९