भवरोगें जे पिडले लोक ।
तिहीं आवश्यक सेवावें ॥१॥
महा मात्रा हरिकीर्तन ।
उरलें रसायन निज निगुतीं ॥२॥
मागें बहुतां गुणसी आलें ।
आरोग्यचि ठेविलें करुनियां ॥३॥
निळा म्हणे सांगता फार ।
होईल विस्तार नामें त्यांची ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.