नित्यानंदे घोषें करितां – संत निळोबाराय अभंग – १०९७
नित्यानंदे घोषें करितां हरीचें कीर्तन ।
श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥१॥
आणिकहि लोक तरती त्यांच्या सहवासें ।
भाळया भोळया भाविकांसी लाभ अनायासें ॥२॥
जेथें नित्य नामघोष टाळिया गजर ।
तेथें रंगी नृत्य करी रुक्मिणीवर ॥३॥
निळा म्हणे तोचि प्रसन्न होउनी दासासी ।
भुक्ति आणि मुक्ति ठेवी त्यांच्या सहवासीं ॥४॥