देखोनियां संतमेळा – संत निळोबाराय अभंग – १०९४
देखोनियां संतमेळा ।
कीर्तन सोहळा धांव घाली ॥१॥
ऐकावया आपुलीं नामें ।
गुणसंभ्रमें नित्य नवे ॥२॥
बैसोनियां प्रेम वांटी ।
नाचे परवडी मग सवें ॥३॥
निळा म्हणे आपुल्या सुखें ।
वांटी हारिखें भुक्ति मुक्ति ॥४॥