चर्हाटिया दंतकथा । माजी अनर्था कारण ते ॥१॥ शुध्द भावें हरि कीर्तन । करितां जनार्दन संतोषे ॥२॥ चातुर्यवाणी रंजवण । थित्या खंडण प्रेमाचें ॥३॥ निळा म्हणे घडती दोष । निंदा उपहास इतरांचे ॥४॥