कोणाचीहि न धरुनी – संत निळोबाराय अभंग – १०९०
कोणाचीहि न धरुनी आशा ।
भजावें जगदीशा कीर्तनें ॥१॥
मग तो कृपेचा सागर ।
उतरील पार भवसिंधू ॥२॥
तोडूनियां ममता जाळ ।
करील कृपाळ वरी कृपा ॥३॥
निळा म्हणे आवडी त्यासी ।
कीर्तनापाशी तिष्ठतु ॥४॥
कोणाचीहि न धरुनी आशा ।
भजावें जगदीशा कीर्तनें ॥१॥
मग तो कृपेचा सागर ।
उतरील पार भवसिंधू ॥२॥
तोडूनियां ममता जाळ ।
करील कृपाळ वरी कृपा ॥३॥
निळा म्हणे आवडी त्यासी ।
कीर्तनापाशी तिष्ठतु ॥४॥