किर्तनाचा घोष गजर – संत निळोबाराय अभंग – १०८७
किर्तनाचा घोष गजर ।
ऐकतां अपार उध्दरले ॥१॥
ऐसे किती सांगावे ते ।
कीतनें सरते वैकुंठी ॥२॥
आदिकरुनी स्त्रिया बाळें ।
कीर्तनकल्लोळें हरिपदीं ॥३॥
निळा म्हणे श्रोते वक्ते ।
एकात्मतेतें पावले ॥४॥
किर्तनाचा घोष गजर ।
ऐकतां अपार उध्दरले ॥१॥
ऐसे किती सांगावे ते ।
कीतनें सरते वैकुंठी ॥२॥
आदिकरुनी स्त्रिया बाळें ।
कीर्तनकल्लोळें हरिपदीं ॥३॥
निळा म्हणे श्रोते वक्ते ।
एकात्मतेतें पावले ॥४॥